कधी आहे मीठी ईद? कशी झाली ईद साजरी करण्याची सुरूवात, जाणून घ्या सविस्तर

संपूर्ण देशभरात ईद साजरी केली जातंय. मोठा उत्साह ईदचा बघायला मिळतोय. ईद हा मुस्लिम समाजाचा महत्वाचा मोठा सण आहे. एक महिना रोजे ठेवले जातात. त्यानंतर शेवटी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. या ईदचा मोठा इतिहास आहे. जाणून घ्या ईदचा इतिहास.

ईद हा मुस्लिम समाजाचा महत्वाचा सण आहे. फक्त भारतच नव्हे तर जगभरात ईद साजरी केली जाते. ईदनिमित्त महिनाभर रोजा धरला जातो. या ईदला मीठी ईद म्हणून देखील म्हटले जाते.

आता देशभरात ईदचा उत्साह बघायला मिळतोय. उद्या 11 एप्रिलला देशभरात ईद साजरी केली जाणार आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा वर्षाचा नववा महिना आहे आणि दहावा महिना शव्वाल आहे.

या महिन्याच्या पहिल्या दिवशी इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक ईद साजरी करतात. ईद 624 मध्ये प्रथमच साजरी करण्यात आल्याचे मानले जाते. ईद पैगंबर मुहम्मद यांनी साजरी केली.

ईद उल फितरच्या नावाने देखील ओळखली जाते. ईदला मीठी ईद देखील म्हटले जाते. कुरानसाठी अल्लाहचे ईदच्या दिवशी लोक आभार देखील मानतात.

ईदच्या दिवशी शीर कुंभा तयार केला जातो. घरी येणाऱ्या पाहुण्यांना तो दिला जातो. ईद हा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *