राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने जाहीरनामा (शपथनामा) प्रसिद्ध!

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा शपथनामा दिनांक 25 एप्रिल रोजी शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध करण्यात आला.

१. “शपथ नाम्यामध्ये सांगितलेल्या मुद्द्यांचा आमचे सर्व खासदार देशाच्या संसदेमध्ये आग्रह करतील देशातील पद दलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, लहान उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि देशातील सर्वात मोठे प्रश्न असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील.,,

२. “जीएसटी साठी एक कौन्सिल केले जाईल व त्यांना पूर्ण अधिकार दिले जातील व केंद्राला मर्यादित अधिकार राहतील शेती आणि शैक्षणिक वस्तूवर शून्य जीएसटी असेल.,,

३. “स्वयंपाक घरातील गॅसच्या किमती कमी करू 500 रुपयावर घरगुती गॅसच्या किमती आणू आणि गरज पडल्यास केंद्र सरकारकडून त्याला सबसिडी देण्याचा प्रयत्न करू पेट्रोल आणि डिझेलवरील करांची पुनर्रचना करू देशातील महागाई वाढण्यासाठी सर्वात मोठं कारण हे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे त्याला मर्यादित करण्याचे काम आम्ही करू.,,

४. “देशात काही लाख शासकीय जागा रिक्त आहेत आम्ही जर सत्तेत आलो तर त्या रिक्त जागा भरण्याचा आग्रह धरू व देशातील जनतेला सरकारच्या माध्यमातून चांगली सेवा देऊ शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांचे आरक्षण 50 टक्के पर्यंत नेण्याचा आम्ही आग्रह धरू शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचे काम करू कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरी देण्याचे आम्ही बंद करू.,,

५.”डिग्री आणि डिप्लोमा फास्ट आऊट झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दर महिना आठ हजार पाचशे रुपये स्टायपेंड मिळेल ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून आकारले जाणारे शुल्क आमचे सरकार आल्यावर माफ केले जाईल खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एससी एसटी ओबीसी आरक्षण देण्याचे काम आम्ही करू.,,

६.”महिला आणि मुलींसाठी शिक्षणात असलेल्या अडचणी दूर करण्याचे काम आम्ही करू ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर महिलांचे सुरक्षा करण्यासाठी कडक कायदे आणले जातील. शाळा आणि महाविद्यालयांसाठी सेफ्टी ऑडिट राबवले जाईल. महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये आरक्षण देण्याचा जो आदरणीय पवार साहेबांचा आग्रह आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करू. अंगणवाडी सेवकांची संख्या वाढवू त्यांचे केंद्रीय अनुदान वाढवू महालक्ष्मी योजना म्हणून प्रत्येक कुटुंबातील महिलेला आम्ही दरवर्षी एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य करू.,,

७. “शेतकऱ्यांचा विकास आधारभूत दर आयात – निर्यात धोरण कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात येईल ज्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही नवीन शेती तंत्रज्ञानाला जास्त बळकटी देण्याचे काम आम्ही करू.,,

८.”दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू. आरक्षणाची 50% मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. अल्पसंख्यांकांसाठी ची सच्चर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार, मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे काम करणार. गरिबांना मोफत रेशन मिळावा यासाठी पात्रतेमध्ये आम्ही सुधारणा करू. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यस्तरावर आयोगाची निर्मिती करू.,,

९. “2028 – 29 पर्यंत आरोग्यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 4% पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार. सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्र दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मोफत करण्याची मागणी करणार. अग्नीवीर योजना रद्द करू.,,

खासदार वंदना चव्हाण यांनी हा शपथनामा बनवताना प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांच्या टीम मध्ये युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्ष रोहिणी ताई खडसे, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सरचिटणीस बसवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे आणि इतर सेलचे अध्यक्ष यांचा समावेश होता या सर्वांनी मोठी मेहनत हा शपथ नाव बनवताना घेतली. मला विश्वास आहे की हा शपथनामा लोकांना आवडेल. कोर्पोरेट साठी पक्षपाती धोरणे अवलंबिली जात आहेत. आणि त्या माध्यमातून इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून प्रचंड देणग्या घेण्याचे आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत. या सगळ्या गोष्टीवर आम्ही आमची भूमिका जाहीरनाम्यातून मांडले आहे व समाजातील प्रत्येक घटकावर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *