शहा ग्रामपंचायत चा मनमानी कारभार, ग्रामपंचायत कायम बंदच, तीन वर्षात एकही ग्रामसभा नाही!

शहा ग्रामपंचायत कायम बंद असल्याने तसेच तीन वर्षात शहागावात ग्रामस्थांमधून एकही ग्रामसभा न घेतल्याने शहा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका संजीवनी मराळ यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच त्यांचे काम पक्षपाती पणे व पूर्वग्रह मनात ठेवून होत असल्याचे व स्थानिक पुढाऱ्यांच्या मनमानी प्रमाणे होत असल्याचे निदर्शनास येत आहे ग्रामसेविका संजीवनी मराळ यांच्याकडे दोन गावे असल्याने त्यांनी सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस दिलेले आहेत परंतु या दोन्ही दिवशी ते गैरहजर असतात तसेच महिना भर ग्रामपंचायत उघडत नसल्याने लोकांची कामे खोळंबली जातात,लोक सोमवारी आणि गुरुवारी स्वतःची कामे बुडवून ग्रामसेवक यांची दिवसभर वाट पाहत बसतात परंतु ग्रामपंचायत उघडत नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांवर एक प्रकारे अन्याय केला जात आहे शहागावामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे याबद्दल माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागण्याचा अर्ज देण्यासाठी लोक ग्रामपंचायत कडे घेऊन येतात परंतु ग्रामपंचायत कडून कोणतीही माहिती दिली जात नाही हा भ्रष्टाचार उघडकीस न येण्यासाठी ग्रामसभा घेतली जात नाही ग्रामसभा ही फक्त कागदावरच दाखवली जाते तर मासिक सभा झाले असे दाखवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य च्या घरी जाऊन त्यांच्या सह्या आणल्या जातात व मासिक सभेमध्ये ठराव मंजूर झाले असे दाखवले जातात याबद्दल पंचायत समिती येथे वारंवार तक्रार करून देखील कुठलीही दखल घेतली जात नाही, या प्रशासकीय व्यवस्थेच्या कामासाठी जबाबदार कोण व हा मनमानी कारभार किती दिवस चालणार असा प्रश्न शहा गावातील नागरिकांकडून होत आहे.

One thought on “शहा ग्रामपंचायत चा मनमानी कारभार, ग्रामपंचायत कायम बंदच, तीन वर्षात एकही ग्रामसभा नाही!

  1. Arbitrary management of Shah Gram Panchayat, Gram Panchayat is closed forever, there is no gram sabha in three years!
    Since the Shah Gram Panchayat is permanently closed and no gram sabha has been held in Shahgaon in three years, the Shah Gram Panchayat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *