IPL 2024, RR vs GT : आरसीबीविरुद्ध शतक, शुभमन गिलचा बटलरसाठी विशेष प्लॅन, राशिदच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेम

IPL 2024, RR vs GT : आरसीबीविरुद्ध शतक, शुभमन गिलचा बटलरसाठी विशेष प्लॅन, राशिदच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेम RR vs GT : राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सलग चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आज शतकवीर जोस बटलर मोठी खेळी करु शकला नाही.

जयपूर : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात सलग चार मॅचमध्ये विजय मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना 2022 च्या आयपीएलच्या पर्वाचं विजेतेपद पटकावणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात आज मॅच सुरु आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या सलामी जोडीनं सावध सुरुवात केली. मात्र, राजस्थानचे दोन्ही सलामीवर चांगली कामगिरी करु शकले नाहीत. यशस्वी जयस्वालला सूर गवसणार असं वाटत असताना तो 24 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे आरसीबी विरुद्ध 20 ओव्हर बॅटिंग करणारा जोस बटलर (Jos Butler) मोठी खेळी करेल, अशी आशा असताना राशिद खाननं (Rashid Khan) राजस्थानला धक्का दिला. गेल्या मॅचमध्ये शतक झळकवणारा जोस बटलर यावेळी मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *