कांदलगाव केंद्र कडून तीन शिक्षकांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न!

इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होते. शिक्षक म्हणजेच शि – शीलवान, क्ष – क्षमाशील, क – कर्तृत्ववान ज्यामध्ये हे सर्व गुण असतात, तोच खरा आदर्श शिक्षक होय. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी रास्त अपेक्षा असते. असेच सर्व गुण संपन्न असलेल्या या तीन आदर्श शिक्षकांचा कांदलगाव केंद्राकडून सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. हनुमंत दिनकर शिंदे हे 9 नोव्हेंबर 1989 सालापासून 2013 दौंड तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते नंतर 2013 ते 2014 या कार्यकाळात त्यांची इंदापूर तालुक्यामध्ये केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एकूण 35 वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली.शंकर तुकाराम कचरे हे 4 नोव्हेंबर 1987 पासून 2005 पर्यंत दौंड तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून सेवा करत होते त्यानंतर ते इंदापूर तालुका येथील शहा गाव येथे दहा वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले व गलांडवाडी नंबर एक येथे ते मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत त्यांनी 37 वर्ष काम केले. युसुफ सय्यद पठाण 20 जुलै १९९२ रोजी सरडेवाडी येथील गायकवाड सिद वस्ती येथे 32 वर्ष उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. या तीन शिक्षकांची प्रत्येक ठिकाणी एक आदर्श शिक्षक म्हणून ओळख आहे. या सत्कारमूर्ती शिक्षकांना सेवापूर्ती सत्कार सोहळा निमित्त मनोगत व्यक्त करताना अश्रूअनावर झाले. यावेळी सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, विस्तार अधिकारी संजय रुईकर,केंद्रप्रमुख गावडे सर, चव्हाण सर, माजी विस्ताराधिकारी धापटे मॅडम, धापटेसर तसेच केंद्रातील सर्वच शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *