निधीची धमकी दिल्याने निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी; आ. रोहित पवार

इंदापुर वकील आणि व्यापारी संघटना यांच्या बैठकी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी कचाकचा बटणं दाबा, बटणं दाबाल तर निधी देता येईल नाहीतर आकडता हात घेणार असं विवादास्पद विधान अजित पवार यांनी केले आहे. या विधानाबद्दल आ. रोहित पवार यांनी पुढील प्रमाणे ट्विट केले, अजित दादांनी सगळे भाषण करताना निधीबाबत व्यक्तव्य केल्याचे समोर आलं. दादा नेमके कोणते निधीबाबत बोलत आहेत? #मलिदा_गॅंगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्राकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधी बाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी! असे ट्विट आ. रोहित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *