गुढीपाडवा झाल्यानंतर महाराष्ट्रात यात्रा सुरू होतात या यात्रेमध्ये ठिकठिकाणी कुस्ती मैदानी भरवले जातात, यावेळी महाराष्ट्रातील वर्षभर मेहनत घेतलेले पैलवान हे पूर्ण ताकतीने या यात्रे हंगामात उतरतात व डोळ्याचे पारणे फिटेल अशी काटा कुस्ती करतात परंतु मोठी मोठी कुस्ती करून देखील त्यांना हवे असे बक्षीस भेटत नाही, कारण हरियाणा आणि दिल्ली येथील पैलवान येतात व नुरा कुस्ती करून मोठे बक्षिसे घेऊन जातात.
महाराष्ट्रातील बरेच पहिलवान हे गरीब कुटुंबातील आहेत, परिस्थिती हलाखीची असूनही या मुलांचे वडील हे आपला मुलगा हा एक उत्तम पहिलवान व्हावा यासाठी उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर ठेवून त्या मुलासाठी खाण्यासाठी खुराक देण्यासाठी धडपडत असतात. अशा पैलवानांना या यात्रा हंगामात प्राधान्य द्यावे अशी सर्व यात्रा कमिटींना विनंती आहे.
राजकीय नेते आपले वाढदिवस व इतर कार्यक्रमासाठी हरियाणा दिल्ली येथील पैलवान बोलावून तात्पुरती गर्दी करतात अशा नेत्यांना ही विनंती आहे की महाराष्ट्रातील पैलवानांचं अस्तित्व टिकवायचे असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक पैलवानांना प्राधान्य दिले पाहिजे. अशी स्थानिक पैलवान कडून मागणी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्ती मैदाने वाचवा, पैलवान वाचवा आणि महाराष्ट्रीयन परंपरा वाचवा.
आपल्या पैलवानांसाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
बातमीतच सत्यता…✍🏻
संपादक: संतोष निकम.
संपर्क: 7020363582.