महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ताकद सोलापूर,माढा, बारामती लोकसभा मतदारसंघात वाढत आहे, यामुळेच बारामती लोकसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तसेच पक्षप्रमुख संजयभैय्या सोनवणे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या वेळी तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण अशा घोषणा कार्यकर्ते देत होते तुम्ही जो निर्णयघ्याल तो योग्यच असेल तेव्हा तुम्ही ज्या उमेदवारांचे काम करायला सांगाल त्यांचे आम्ही पुर्ण ताकदीने काम करू असेही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत असताना म्हणाले की मी इतर नेत्याप्रमाणे तुम्हाला आदेश देणार नाही, तर तुम्ही कार्यकर्ते जो निर्णय घ्याल तोच विचार करु तसेच काही दिवसातच प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी भेटुन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते कुरुंमदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण बापू गायकवाड,सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन आढाव सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष भूषण ननवरे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सारिकाताई गायकवाड,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय बनसोडे ,अनिल कडाळे ,इंदापूर तालुका अध्यक्ष अंगद गायकवाड ,युवक अध्यक्ष तुषार भोसले,पुणे जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्ष दीपक कांबळे,इंदापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष संतोष निकम, देवा मोरे दिनेश गायकवाड, अमोल कांबळे, किशोर कडाळे,सुरज सलगर, सागर शिंगाडे,सुरज चव्हाण , कार्यालयीन सचिव नितीन गायकवाड,सर्व पदाधिकारी व कार्येक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.