अजित पवार हे आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात बारामतीत नुकतेच मतदान पार पडले त्यानंतर अजित पवारांनी आपल्या मनातील एक गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली बारामतीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या व्यक्तव्या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे एवढेच नाही तर त्या व्यक्तव्यावर आपण चंद्रकांत पाटील यांना तुम्ही तुमचं पूणं बघा आम्ही बारामती बघतो असे सांगितले होते असंही अजित पवार म्हणाले
बारामती लोकसभेच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील हे बारामतीत आले होते त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा पराभव करा त्यांचा पराभव झाला पाहिजे त्यांचा पराभव हवा आहे अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते बारामती मध्ये जाऊन त्यांनाही आव्हान केले पवारां विरोधात केलेले हे वक्तव्य बारामतीकरांना तेवढे भावले नाही, असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे त्याचाही फटका महायुतीच्या उमेदवाराला बारामतीत बसला याची जोरदार चर्चा सुरू आहे पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्त्यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला होता चंद्रकांत पाटील असे बोलून गेले हे माहीत नाही पण ते चुकीचे बोलले त्यांनी असे व्यक्त करायला नको होते शरद पवारांचा पराभव करण्यासाठी ते काही निवडणुकीला उभे होते का असा प्रश्न त्यांनी पाटील यांना केला पराभव हा सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी होणार आहेत त्यात पवार साहेबांना का आवडले अशी विचार नाही त्यांनी केली त्यामुळे त्यांना आपण तुम्ही पुणे सांभाळा आम्ही बारामती सांभाळतो असे अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले त्यानंतर चंद्रकांत पाटील बारामतीकडे फिरकले नाहीत असे दादांनी सांगितले.
बारामतीत लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे जवळपास 59 टक्के मतदानाची नोंद या मतदारसंघात झाली सुप्रिया सुळेविरुद्ध सुमित्रा पवार असे थेट लढत येथे होती राज्यातल्या चुरशीच्या लढतीपैकी ही एक लढत होती शरद पवारांनी अजित पवारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.
