राजकारणातील चाणक्य समजले जाणारे शरदचंद्र पवार यांनी आज (दि१६) राजकीय नवा डाव टाकून इंदापूरचे समिकरण बदलले आहे.
पुणे जिल्हा सहकारी बँक व इंदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व निरा भिमाचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह बाजार समितीचे सभापती विलास माने, भाजप शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांच्यासह इंदापूर तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी व हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह आज (दि.१६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला, त्यांच्या प्रवेशामुळे अनेक राजकीय गणिते वेगळे होऊ शकतात.
त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक मध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडे इंदापूर तालुक्यातील तगडे आव्हान दिसणार आहे, या प्रदेशामुळे राजकारणातील चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे.
या मोठ्या नेते यांच्या पक्ष प्रवेशामुळे बारामती लोकसभेच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे हा पक्ष प्रवेश शरद चंद्र पवार व आ. रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाला.