डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अनोखं अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी शासकीय योजनेतून वीज बोलेरो पिकप देऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अनोखं अभिवादन केले आहे.

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख व संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते संजयभैया सोनवणे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनेतून युवकांना रोजगार मिळावा यासाठी जवळपास 67 बोलेरो पिकअप मंजूर केले आहेत, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पहिल्या टप्प्यातील वीस बेरोजगार तरुणांना वीस बोलेरो पिकअप देण्यात आले.

देशातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात देखील उच्चशिक्षित युवक बेरोजगारीची सामना करीत आहेत तसेच अनेक युवक आंबेडकर चळवळीमध्ये योगदान देत आहेत त्या बेरोजगार युवकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी शासकीय कोट्यातून युवकांना रोजगार देण्याचे आदर्श कार्य महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी अगदी नियोजनबद्ध केले आपला कार्यकर्ता असो किंवा नसो माणसाला माणूस म्हणून समजणारे संजय सोनवणे नेहमीच युवकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कार्यरत असतात त्यांनी महाराष्ट्र पक्षाची स्थापना करण्या अगोदर पासूनच हजार युवकांना जात पात न पाहता रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांचे सर्व जाती धर्मात सलोख्याचे संबंध आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युवकांना मार्गदर्शन केले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की माझे तळागाळामध्ये रंजले गांजलेले तरुण वर्गाला वर आणण्याचे प्रयत्न हा केला पाहिजे तसेच त्यांना आपल्या सोबत कसे नेता येईल यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे तसेच या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट हे गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय मिळवून देणे तसेच समाजातील कितपत पडलेल्या लोकांना मदतीचा हात देऊन वर काढण्याचा प्रयत्न करणे हे आहे, यावेळी …

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांनी उपस्थित राहून संजय भैय्या सोनवणे यांच्या कार्याचे खूप कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे नेते नारायण गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष अंगद गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कडाळे, विजय बनसोडे, इंदापूर तालुका युवा अध्यक्ष तुषार भोसले, देवा मोरे, सरडेवाडी ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्य गोकुळ कोकरे, सदस्य, नामदेव तोबरे, किशोर कडाळे सुरत सलगर, सागर शिंगाडे ,सुरज चव्हाण कार्यालयीन सचिव नितीन गायकवाड सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अनोखं अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *