कराड दि.14-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२३-२४ च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कराडमधील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा रोवला आहे.शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे.
यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून कु. रुही साळुंखे ही ८५% मिळवून प्रथम, कु. आरोही कदम ही ८४.६० % मिळवून द्वितीय तर कु. स्नेहलता भोसले ही ७९.६० % मिळवून तृतीय आली आहे. दहावी परीक्षेत प्रविष्ट झालेले सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गार्गी पवार हिने याने ९८.६० % मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे, तर द्रव्य छाजेड शहा याने (९७.४०%) दुसरा क्रमांक, राशी ओसवाल आणि समीक्षा संकपाळ (९७.२० %) यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे.
या वर्षीही दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा जोपासत विविध विषयात प्राविण्य प्राप्त केले आहे. गणित विषयात गार्गी पवार (१०० गुण), आईटी-४०२ मध्ये गार्गी पवार आणि द्रव्य छाजेड शहा (१०० गुण), मराठीत राशी ओसवाल (१०० गुण), इंग्रजीत द्रव्य छाजेड शहा (९९ गुण), शास्त्र विषयात द्रव्य छाजेड शहा (९७ गुण), हिंदीत ओमकार धस (९७ गुण) यांनी यश संपादन केले.
सदर परीक्षेत ९० % पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले ३४ विद्यार्थी, ८०% ८९% मध्ये ३३, ७०% – ७९ % मध्ये २०, ६०% ६९% मध्ये ०७, ५०% ५९% मध्ये ०१ विद्यार्थी या नेत्रदीपक यशाचे मानकरी ठरले आहेत.
पोदार पॅटर्न हेच या यशाचे गमक आहे.
शाळेच्या उपप्राचार्या सौ. स्वाती नांगरे यांनी शाळेमधून राबवलेला ‘पोदार पॅटर्न’ हेच या यशाचे गमक आहे, असे सांगून या अभिमानास्पद यशाचे साक्षीदार असणारे सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
शाळेचे प्राचार्य श्री. अन्वय चिकाटे यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली विशेष तयारी, वेगवेगळ्या पद्धतीच्या सराव परीक्षा, शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य यामुळेच शाळेने बाजी मारली, असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. अन्वय चिकाटे, उपप्राचर्या सौ. स्वाती नांगरे, प्रशासकीय अधिकारी श्री. विशाल जाधव, शैक्षणिक विभागाचे समन्वयक श्री इमामपाशा शेख व श्री. रोहित कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.