शालेय विद्यार्थ्यांना “मनुस्मृतीची” गरज नसून त्यांना “भारतीय संविधान” शिकवण्याची गरज आहे असे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मा.श्री.संजय भैय्यासाहेब सोनवणे. यांनी पत्रकार परिषद घेत “मनुस्मृति आणि शिक्षण मंत्री , व बीजेपी सरकारचा” तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला.
देशात विषमता प्रस्तापित करणाऱ्या , समता बंधुता स्वतंत्र आणि न्याय या मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या , स्त्रियांना पशुपेक्षा हीन मानणाऱ्या माणसा माणसात जातीधर्म वर्ण पंथ आधारे भेद निर्माण करणाऱ्या मनूची मनुस्मृती अशा मनुस्मृतीला प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली जाळली. व त्याचा नामोनिशान संपवून टाकला. आशा मनुस्मृतीचे पुनर्वसन “बीजेपी सरकार मोदी सरकार” करून पाहत आहे. हे मनुवादी बीजेपी सरकार भारतीय शालेय अभ्यासक्रमातून मुलांना मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने(SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा आराखडा व अभ्यासक्रम लवकरात लवकर बदलून त्या ठिकाणी झालेल्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना भारतीय संविधानाचे शिक्षण द्यावे. अन्यथा महाराष्ट्र मध्ये तीव्र आंदोलन करण्याचे इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय भैय्यासाहेब सोनवणे यांनी दिला आहे.