दि.15 रोजी गोखळी येथे श्री. अनिल (सावकार) चितळकर श्री. अमोल (राज) मकर व श्री कांतीलाल दादा वाघमोडे यांच्या वतीने आदर्श शिक्षक व गुरुकुल विद्या मंदिर गोखळी चे संस्थापक मा. श्री. लक्ष्मण साहेबराव हरणावळ गुरुजी यांचे बरोबरइयत्ता दहावी व बारावी /जेईई /नीट /सीईटी मध्ये उत्कृष्ट गुणसंपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले मा.श्री.भगवान बाबा मकर व मा. श्री. श्रीमंत नामदेव वाघमोडे यांचाही सत्कार इंदापूरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सूर्यकांत जी कोकणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्याची ही गरज आहे, इंदापूर तालुक्यामध्ये गोखळी हे गाव अगदी काही प्रमाणात माहिती होते परंतु अलीकडील काळात गोखळी जवळील इंदापूर असेही लोक उल्लेख करतात, खरे पाहिले तर गोखळी ही शिक्षणाची पंढरी बनली आहे. असेही यावेळी पोलीस निरीक्षक मा.सूर्यकांत कोकणे साहेब यांनी म्हटले आहे.
यावेळीयावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे १. वैष्णवी अभंग ९३% २. मानसी अभंग ९०% ३. सिद्धराज झगडे ८९% ४. समृद्धी टकले ८९% ५. आदित्य वाघमोडे ७७% ६. प्रेरणा वाघमोडे ८६% ७. ईश्वरी पालवे ८. सावित्री वाघमोडे ८६% ९. ऋतुजा राऊत ९०% १०. सृष्टी शेंडे ७७% ११. सारिका चांदणी ७८% १२. अभिजीत गोफणे ९३% १३. सोमा झगडे ८६% १४. स्नेहा झगडे ८६% १५. अमृता सातव ८५% बारावी मधील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे १. सुयश महानवर ९१% २. विश्वजीत मकर ९९% ३. तेजस वाघमोडे ९८%, सीईटी ६०३ ४. मयूर वाघमोडे ८७% ५. सार्थक टकले ७५% ६. स्नेहल राऊत ७७% ७. अविनाश खरात ६०% ८. साक्षी शेंडे ७८%, सी ए टी ९८% ९. साक्षी पारेकर ८२% १०. शिवराज देशमुख ९३% ११. सिद्धांत झगडे ७८% या विद्यार्थ्यांचा गुणगौरव इंदापूरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सूर्यकांत कोकणे साहेब यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एमआरपी पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.अनिल कडाळे पाटील यांनी आभार मानले.