महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

महाविदयालयतील कु. श्रद्धा वाघमारे आणि कु. दिक्षा मिसाळ यांनी तयार केलेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राच्या प्रतिकृतीचे प्रक्षेपण मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कारण्यात आले.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी डॉ. कलाम यांच्या खडतर जीवन प्रवासाबद्दल तसेच आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचे आवाहन केले.
डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड, डॉ. भरत भुजबळ आणि प्रा. बाळासाहेब काळे यांनी डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे अवलोकन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी फरियाल शेख, सौरभ कुंभार, प्रेरणा ठोकळे, प्रतीक्षा वजाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये कलाम यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकत त्यांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी वीर यांनी केले. यावेळी प्रा. अकीन कांबळे, डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. सद्दाम पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विरेश होळकुंदे यांनी केले. आभार प्रा. स्वाती राऊत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील 500 विद्यार्थी उपस्थित होते.