इंदापूर तालुक्यातील शहा गावात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताह आज दि. 23 पासून प्रारंभ झाला आहे, तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ग्रंथ पारायण, कीर्तन अशा पाच दिवसाच्या कार्यक्रमांस उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मा. सरपंच श्री.विष्णू आबा पाटील यांनी केले.

पाच दिवसाच्या कार्यक्रमाची रुपशेषा पुढील प्रमाणे…
महाशिवरात्री अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम दि. 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025 असा पाच दिवस असेल, व प्रत्येक दिवशी सकाळी अल्पोपहार झाल्यानंतर दिवसभर पारायण वाचन होईल, दुपारी जेवण तर संद्याकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद आस्वाद घेता येणार आहे. पहिल्या दिवशी झी टॉकीज फेमस ह. भ. प. बालाजी महाराज बोराडे- परांडा यांचे कीर्तन होईल, तर दुसऱ्या दिवशी सकळ संत कथाकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ – मोरोची तिसऱ्या दिवशी झी टॉकीज फेमस ह. भ. प. छगन महाराज खडके – बीड, चौथा दिवस शिवचरित्र कथाकार ह. भ. प. लालचंद महाराज चोपडे- शहा यांचे सायंकाळी कीर्तन होतील. पाचवा दिवस ह. भ. प. स्वामी रघुनाथ महाराज यांचे अकरावे वंशज ह. भ. प. निखिल महाराज निंबाळकर यांचे सकाळी काल्याचे किर्तन होईल.
व्यासपीठ चालक :- ह.भ.प. महादेव महाराज पाटील शहा, ह.भ.प. मिनिनाथ महाराज कांदलगांव, ह.भ.प. श्री. लहू महाराज निकम शहा हे पाच दिवस व्यासपीठ चालवतील.