युवकांचे प्रेरणास्थान, काटी – वडापुरी गटाचे तडफदार नेते श्री. रवींद्र (शेठ) सरडे यांचा वाढदिवस विशेष!

दि.14 जुलै या दिवशी श्री.रवींद्र (शेठ) सरडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, काही ठिकाणी झाडे लावून, काही ठिकाणी गोरगरिबांना मदत करून तर अनाथ आश्रम, मूकबधिर शाळा, सरकारी दवाखाना अशा ठिकाणी होईल तेवढी मदत केली जाते.

सात वर्षांपूर्वी शहा गावामध्ये श्री रवींद्र शेठ सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त चक्कू, चिंच व आंब्यांची झाडे वाटली होती ही झाडे आज शहागांवा मध्ये मोठ्या दिमाकामध्ये डवलत- डुलत आहेत. सात वर्षांपूर्वी झाडे वाटप करताना श्री.रविंद्र (शेठ) सरडे यांनी ही झाडे मोठी झाल्यावर त्याची फळे लहान थोर नक्की खातील असे बोलले होते, तेच शहागावातील लोक आजही फळे खाताना तो प्रसंग आठवतात.

लहानपणापासून वडिलां बरोबर राजकारणाचे धडे घेतलेले श्री. रविंद्र (शेठ) सरडे यांना राजकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी जास्त अडचणी आले नाही.

सरडेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री रविंद्र (शेठ) सरडे हेकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक होते, तसेच कर्मयोगी सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत, तसेच सरडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतःच्या नेतृत्वावर 11 पैकी 11 उमेदवार निवडून आणून इंदापूर तालुक्यामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली. काटी – वडापुरी गटामध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम घेतले आहेत, तसेच अनेक गोरगरीब लोकांना मदत केली आहे, राजकीय विरोध बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला मदत कशी होईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यांच्या या कार्याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच फायदा होईल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काटी – वडापुरी गटामधून सौ सुप्रिया ताई सुळे यांना खूप मोठे मताधिक्य मिळाले यामध्ये कर्मयोगी सहकारी कारखान्याचे संचालक श्री.रवींद्र (शेठ) सरडे यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. त्यांच्या या प्रयत्नामुळे यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काटी – वडापुरी गटामध्ये नक्की तुतारी वाजेल अशी कार्यकर्त्यांमधून चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *