इंदापूर तालुक्यातील शहा गाव येथिल जिल्हा परिषद शाळेस विद्यमान सरपंच दिलीप वामनराव पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी “सायकलचा आधार, भविष्याला आकार ” या एक हृदयस्पर्शी उपक्रमास सायकल भेट दिले आहे. त्यांच्या या सामाजिक उत्तरदायित्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी सायकल देण्याचा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक विद्यार्थी दूर अंतरावरून शाळेत ये-जा करत आहेत. सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. याविद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा, म्हणून जिल्हा परिषद -नवीन सायकल दान करण्यासाठी एक सामाजिक आवाहन करीत आहे. गावातील दानशूर व्यक्तींनी गावातील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्टच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सायकल दान कराव्यात व इतर व्यक्तींनी व संस्थांनी १५ ऑगस्ट पर्यंत सायकली दान करण्यासाठी जिल्हा परिषदने आवाहन केले आहे.
आज 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पाटील यांनी या सामाजिक उपक्रमाची जिल्हा परिषद शाळा शहा येथे सायकल भेट देऊन सुरुवात केली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी तलाठी कांता देशमुख मॅडम, ग्रामसेवक संजीवनी मराळ, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ, कृषीवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. मारुती काझडे, तसेच किसनराव पाटील, प्रकाश पाटील, मा. सरपंच विष्णू पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष प्रशांत निंबाळकर, माजी सैनिक बाबासाहेब निकम, ग्रा. सदस्य आण्णासाहेब निकम, तंटामुक्ती अध्यक्ष धनाजी ईजगुडे, बलभीम गंगावणे, मा. सरपंच नितीन निकम, तानाजी इजगुडे, रोहिदास इजगुडे, तानाजी गंगावणे, महादेव लांडगे, आबा गंगावणे, समाधान धाईंजे, संजय निकम, आशा सेविका भारती चोपडे, अंगणवाडी सेविका संजीवनी लावंड, स्वाती धाईंजे, शबाना मुलाणी, तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.