सहलीसाठी फसवणूक प्रकरणात योग्य मार्गदर्शन आणि ज्येष्ठांना मिळाला लढण्याचा मार्ग
ज्येष्ठांनी पोलीस निरीक्षकांचे व्यक्त केले आभार..
इंदापूर ता.02
इंदापूर शहरातील 44 ज्येष्ठ नागरिकांचे सहलीला नेतो म्हणून टेंभुर्णी येथील एका व्यक्तीने तब्बल दहा लाखांची फसवणूक केली होती या प्रकरणांमध्ये पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. याबद्दल जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांची भेट घेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की,
इंदापूर शहर व तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या जेष्ठ नागरिकांकडून सहलीसाठी विमान प्रवास,निवास,नाष्टा व भोजन खर्च म्हणून नितीन ट्रॅव्हल कंपनीचे चालक मालक नितीन भारत पांडगळे (रा.टेभुर्णी ता.माढा जि.सोलापूर) याने फसवणूक केल्याबद्दल अखेर इंदापूर न्यायालयात 21 मार्च रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती सहल प्रमुख बाबासाहेब निवृत्ती घाडगे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी,
नितिन टुर्स & ट्रॅव्हल कंपनीचे चालक मालक नितीन भारत पांडगळे याने इंदापूर शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचे गुजरात दर्शन सहलीचे नियोजन करून,जेष्ठ नागरिक संघाकडून सहलीतील सहभागी सदस्याकडून प्रत्येकी 23 हजार रूपये प्रमाणे 44 सदस्यांचेकडून 10 लाख 12 हजार रुपये यापैकी 9 लाख 74 हजार रुपये इतकी रोख रक्कम व उर्वरित काहींचे ऑनलाईन घेऊन सहलीचे वेळापत्रक तयार करून,पुणे ते अलाहाबाद या टाटा इंडिगो विमानाची बोगस तिकीटे बुक करुन,जेष्ठ नागरिक संघास पाठविली.
त्यानुसार जेष्ठ नागरिकांनी सहलीसाठी नियोजन केले.त्यानुसार 25 नोव्हेबर 2024 रोजी सर्व सहल सभासद सकाळी 8: 30 वाजताच्या दरम्यान ठरल्याप्रमाणे,इंदापूर महाविद्यालय समोर जमा झाले.बराच वेळ ट्रॅव्हल बसची वाट पाहत राहिले पण बस किंवा नितीन भारत पांडागळे हे आलेच नाहीत.त्यानंतर गुजरात दर्शन व्हाट्सअप ग्रुपवर नितीन पांडगळे याने स्वत:चा भाऊ सचिन पांडगळे अपघातात मरण पावला आहे.असा मेसेज रात्री 10 वाजता टाकल्याचे निदर्शनास आल्याने जेष्ठ नागरिक महासंघाचे निवडक सभासद,टेभुर्णी येथे पांडगळे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यास गेले असता, समक्ष चौकशीनंतर असे समजले की,कोणताही अपघात झाला नसून, नितीन पांडगळे याने सहलीचे घेतलेले सर्व पैसे इतरत्र खर्च झाल्याने सहल घेऊन जाणे शक्य नाही,म्हणून तो फरार झाला होता.
यामुळे जेष्ठ नागरिक खातास झाले होते यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची भेट घेत व्यथा मांडली त्यावेळी त्यांनी संबंधितांकडून चेक घेत ते बँकेत भरले आणि चेक परत आले या संदर्भात इंदापूर न्यायालयात खटला दाखल केला पोलीस निरीक्षक यांच्या या योग्य मार्गदर्शनाने ज्येष्ठ नागरिकांना पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षकांचे आभार व्यक्त केले
निसर्गरम्य वातावरणात साधला संवाद
इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी जेष्ठ नागरिकांना झाडाखाली खुर्ची टाकून बसण्याची व्यवस्था करत त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी जेष्ठ नागरिकांना आभार मानत असताना कंठ दाटून आला.