इंदापूरच्या निलोफर पठाण राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मानित

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा निलोफर रज्जाक पठाण यांना राज्यस्तरीय सावित्रीची लेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.


राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या निलोफर पठाण या महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्याचबरोबर महिलांना छोटे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी विविध बँका शासकीय योजना या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ही पुढाकार घेत असतात त्याचबरोबर विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम संविधान दिन यासारख्या उपक्रमामध्ये त्या सक्रिय सहभागी असतात.


इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महिला दक्षता समितीच्या सदस्य या नात्याने वेळोवेळी कायदेविषयक बाबींमध्ये त्याचबरोबर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकरणांमध्ये महिलांच्या बाजूने त्या उभ्या असतात तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड या उपक्रमामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
या सर्व कार्याची दखल घेत त्यांना सावता सावित्री वधू वर संस्था पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने यंदाचा सावित्रीची लेक हा विशेष विशेष पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वाघोले विद्यमान अध्यक्ष मारुती भुजबळ, सचिव प्रकाश गडवे, रज्जाक पठाण त्यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *