इंदापूरमध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न होणार; प्रवीणभैय्या माने.

इंदापूर तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच सर्व धर्म हे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सोने प्रतिष्ठानचे संचालक प्रवीण माने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे 

   सोनाई परिवार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. मागील काही वर्षी देखील असाच भव्य दिव्य सर्व धर्म सामुदायिक सोहळ्याचे आयोजन सोनई परिवाराकडून करण्यात आले होते. तो सोहळा देखील भव्य दिव्य झाला होता. 

   या विवाह सोहळ्यामध्ये सोन्याच्या मंगळसूत्र पासून ते जोडप्यांना संसार उपयोगी लागणारे सर्व साहित्य देण्यात येणार असल्याची माहिती माने यांनी दिली आहे.

  विवाहात येणाऱ्या आर्थिक अडचणी यावेळी पैशाची उधळण जाचक हुंडा पद्धती मनुष्यबळाची अडचण वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून सोने परिवाराने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला असल्याचे बोलले जात आहे.

   यावेळी शरद पवार यांना या कार्यक्रमा वेळी आपण आमंत्रित करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर माने यांनी शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहेत त्यामुळे त्यांना आमंत्रित केले जाणारच असे बोलले आहेत, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात एक नवीन ट्विस्ट येणार हे नक्की आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *