इंदापूर : प्रतिनिधी दि.27/9/25
बावडा येथिल प्रसिध्द श्री कामाक्षी पद्मावती मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते महाआरती शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी श्री कामाक्षी पद्मावती चरणी सर्वत्र सुख, शांती व समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना केली. श्री कामाक्षी पद्मावती देवीचे आशीर्वाद कायमच आपले पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. या महाआरती प्रसंगी ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाआरती निमित्त दुपारपासून मंदिरामध्ये गावातील रत्नप्रभादेवी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सध्या मंदिरामध्ये निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दररोज विविध धार्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न होत आहेत, त्यामुळे बावडा गाव व परिसरातील वातावरण धार्मिक बनले आहे.