शिवदत्त जनकल्याण ट्रस्टच्या वतीने हजारो गणेश भक्तांना जिलेबी लाडू वाटप

इंदापूर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर स्तुत्य उपक्रम : उपक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

इंदापूर : इंदापूर शहरातील शिवदत्त जनकल्याण ट्रस्टच्या वतीने अंनत चतुर्थीला, शहरातील गणेश विसर्जन मार्गावर हजारो गणेश भक्तांना जिलेबी, शेंगदाणा लाडू व प्रसाद मोफत वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी ॲड. सचिन मच्छिंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.


यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष धरमचंद लोढा व शिवदत्त जनकल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सचिन चौगुले, पत्रकार संघाचे सचिव सागर शिंदे, इंदापूर संचार च्या उपसंपादिका मोहिनी शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी इंदापूर मुख्य बाजारपेठेतील श्री दत्त मंदिर समोर, उपक्रम घेण्यात आला. यावेळी गणेश विसर्जन मिरवणूक सहभागी सर्व गणेश भक्तांना, शिवदत्त जनकल्याण ट्रस्टच्या वतीने, शेंगदाणा लाडू, जिलेबी, मसालेभात व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विविध सार्वजनिक मंडळानी ट्रस्टचे अध्यक्ष चौगुले यांच्या आणि टीमचा सन्मान केला.

यावेळी उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता पवार, रामा पवार,बंडू काकडे, अनंत गवळी, सीमा गवळी,अमोल आवटे, किरण जाधव, गौरी पवार, निखिल चौगुले, शितल चौगुले, अनिता चौगुले, काजल चौगुले,नितीन ढावरे, शहाजी ढावरे , सुनिता पवार, सविता जाधव, ऋषिकेश दुर्गा शिंदे, , रुपेश जाधव, मानसी पवार, सुनिता चौगुले यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *