लाईव्ह महान्यूज : संतोष निकम…
इंदापूरः– इंदापूर नगरीचे उपनगराध्यक्ष भरत शहा हे नेहमीच इंदापूर नगरीचा विचार करून भविष्यातील जडणघडण करत असतात, इंदापूर शहर व परिसराचा विकास वेगाने वाढवायचा असेल तर भीमा नदीवर पूल होणे गरजेचे आहे, हा पूल झाल्यानंतर इंदापूर शहरातील व्यापारी दळणवळण तसेच पर्यटनाचा विकास होईल या दृष्टीने विचार करून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी तसेच सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी संदीप वाशिंबेकर, युवा उद्योजक भावेश ओसवाल व शहरातील व्यापारी संघटनेने लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहा यांच्या निवासस्थानी आल्यानंतर भीमा नदी बरती पूल व्हावा अशी मागणी यावेळी अजित पवार यांच्याकडे केली होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही गरज ओळखून तात्काळ यावरती उपाययोजना करीत निधी मंजूर केला होता, यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनीही पाठपुरावा केला आहे. आता या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे..
इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या भीमा नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या पुलामुळे उजनी धरणातील पर्यटनाला चांगली चालना मिळण्यास मदत होणार आहे. इंदापूर शहरातील बाजारपेठेतील व्यापारवाढीसाठीही या पुलामुळे वाढर्णाया दळणवळणाचा फायदा होईल.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील गावांना इंदापूर तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असर्णाया गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने ८० ते ९० कि. मी. भिगवण, टेंभुर्णी येथून वळसा घालून किंवा जीव धोक्यात घालून जलमागनि प्रवास करावा लागतो. आत्तापर्यंत जलवहातुकीमध्ये ४० हून अधिक प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे.
उपनगराध्यक्ष भरत शेठ यांची मागणी तात्काळ लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच विधानसभेत याचा पाठपुरावा करून विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी देऊन २३ ऑगस्ट २०२४ रोजी भूमिपूजन केले होते.
आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने दोन्ही काठच्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. हा पूल झाल्यानंतर मोठी अडचण दूर होणार आहे. हा पूल झाल्यावर पर्यटन, मत्स्य व्यवसाय, पक्षी निरीक्षण, कृषी व दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी चालना मिळणार आहे.
भरत शहा हे इंदापूरच्या नागरिकांसाठी किती दूरदृष्टीचे लोकनेते आहेत हेच या शिरसोडी कुगाव पुलाच्या उदाहरणावरून इंदापूर शहरातील जनतेला कळाले आहेत.. त्यामुळे इंदापूरची जनता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भरत शहा यांना साथ देतील यात शंका असण्याचं काहीच कारण नाही