महाराष्ट्र सरकारकडून ६५ वर्षांवरील नागरिकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजना” – 3000 रुपये बँक खात्यात”

🌐 *सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु करण्यात आली आहे.*

💡 *लाभ:*

महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना ₹३,००० एकरकमी बँक खात्यात जमा केले जातील.

📋 *अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:*

– 📜 *आधार कार्ड*

– 💳 *राष्ट्रीयकृत बँक पासबुक*

– 🖼️ *पासपोर्ट आकाराचे २ फोटो*

– 🏷️ *रेशन कार्ड*

– ✍️ *स्वयं-घोषणापत्र*

📝 *अर्ज प्रक्रिया:*

पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.

🛠️ *उपकरणांचा समावेश:*

– 👓 *चष्मा*

– 🔊 *श्रवणयंत्र*

– ⚖️ *ट्रायपॉड*

– 🦯 *स्टिक व्हील चेअर*

– 🚶 *फोल्डिंग वॉकर*

– 🚻 *कमोड खुर्ची*

– 🦵 *नी-ब्रेस*

– 🏋️ *कंबर बेल्ट*

🧘‍♂️ *मनःस्वास्थ केंद्र व योगोपचार:*

मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकवेळ एक रकमी ₹३,००० बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.

💼 *अधिक माहितीसाठी:* 

संपर्क करा – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय

➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *