रोटरी क्लब ऑफ इंदापूर 2024-25 या वर्षीच्या अध्यक्षपदी अँड. मोरेश्वर कोकरे यांची निवड करण्यात आली.
रोटरी क्लब इंदापूर दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमामध्ये हिरवी ने सहभाग घेतो, आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने सतत चांगल्या कामांमध्ये चर्चेत असतो. या क्लबचे यावर्षीचे अध्यक्ष अँड. मोरेश्वर कोकरे यांच्या रोटरी वर्ष 2024 – 25 चा वर्षाचा पहिला दिवस होता.
डॉक्टर हे 365 दिवस 24 तास रुग्णांना सेवा देत असतात.
आपल्या जीवनात डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो, डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब इंदापूरचे 2024-25 चे अध्यक्ष रोटरियन मोरेश्वर कोकरे व सर्व रोटरी मेंबर्स यांच्या वतीने काल (दि.1) इंदापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स जे समाजाची आणि रुग्णांची सेवा करतात, याचा आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान केला गेला.
यावेळी भारतीय जैन संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष मा.धरमचंद लोढा, मा.वसंतराव मालुंजकर, मा.राजाराम सागर, मा.संजय दोशी, मा.समीर सूर्यवंशी, मा.नितीन शहा, मा.नरेंद्र गांधी, मा.उदय शहा, मा.आझाद पटेल उपस्थित होते.