लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट.

  • Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

शरद पवारांनी (Sharad Pawar) तब्बल 55 वर्षांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली. मात्र यामागे आहे शरद पवारांचं आपल्या लेकीसाठी असलेलं प्रेम. बारामती लोकसभेच्या रणांगणात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळतोय. शरद पवारांची लेक म्हणजे सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) पवारांचीच सून म्हणजे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या ठाकल्या आहेत. अजित पवारांचं बारामतीमधलं वर्चस्व पाहता नणंद-भावजयीमधली लढाई सुप्रिया सुळेंसाठी वाटते तितकी सोपी नाही. म्हणूनच शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघांमधल्या आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसोबतही जुळवून घेताना दिसतायत.

पवार-काकडे संघर्ष

पवार आणि काकडेंचा संघर्ष राजकारणात सर्वांनाच ठावूक आहे. काकडेंच्या संघर्षातूनच शरद पवारांचा बारामतीत राजकीय उदय झाला. पवारांआधी बारामतीत काकडे कुटुंबियांचं प्रस्थ होतं. मात्र शरद पवारांनी काकडे कुटुंबियांना शह देत बारामतीत आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. पवारांचे राजकारणातले प्रतिस्पर्धी अशी काकडेंची ओळख आहे. जिल्हा परिषदेपासून ते सहकारी साखर कारखाने, बाजार समिती, पतसंस्था अशा सर्वच ठिकाणी काकडे कुटुंबियांनी पवारांविरोधात लढा दिला. त्यामुळे पवार आणि काकडे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *