इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेची विविध कारणाने लांबलेली निवडणूक जाहीर झाली असुन नुकतीच गटनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली आहे. त्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार तयारीला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. इंदापूर तालुक्यात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे वडापुरी – माळवाडी गट. या जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण पुरुष तर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षण आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्या बाशिंग बांधून बसले आहेत.
सध्या जोरदार चर्चा पंचायत समिती सदस्य सतिश (गोटू) पांढरे यांची होत आहे. कारण, `सतीश भाऊ पांढरे फिक्स जिल्हा परिषद सदस्य” अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर सर्वत्र दिसून येत आहे. या गटातील प्रत्येक गावामध्ये मानणारा युवक वर्ग तसेच पंचायत समिती इंदापूर, जिल्हा परिषद पुणे येथे स्वतः जाऊन सर्वसामान्य लोकांचे कामे मार्गी लावून आपल्या कामांचा ठसा गावागावात उमटवलेला आहे. तसेच युवकांबरोबर वृद्ध, अपंग, शेतकरी, यांना शासन योजनांचा लाभ घेता यावा यासाठी स्वतः कागदपत्रे गोळा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे काम पांढरे यांनी केले आहे त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क दिसून येत आहे.
कृषि मंत्री, दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटी – वडापुरी (जुना गट) या गटात अनेक विकास कामे केली आहेत. तसेच अनेक गावामध्ये पांढरे यांच्या विचाराचे सरपंच असल्याने पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कायम पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सतीश पांढरे यांना मामा पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून बढती देतील का ? अशी चर्चा सर्वत्र चालु आहे.