इंदापूर : मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर येथे दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पने मधून व राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व्हिडिओद्वारे या कार्यक्रमाचे राज्यांमधील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व खात्याच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे या दिनाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस पी एम कॉलेज पुणे येथील प्रा. पोपट शिंदे यांनी सामाजिक समरसता या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.
” भारतीय समाजाला समरस झाल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही ” असे प्रतिपादन केले.
अतिथी म्हणून इंदापूर तहसील चे नायब तहसीलदार विजय घुगे,बाळासाहेब ढवळे उपस्थित होते. तसेच संस्था व्यवस्थापन समिती सदस्य श्री. प्रेमकुमार जगताप, कुणाला काळे,विजय अढाव यांनी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन केले. त्यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना शिवाजीराव मखरे, कैलास कदम, मयुर शिंदे, मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्था व्यवस्थापन समिती आणि संस्थेचे प्राचार्य श्री. नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रुकसाना शिकलगार यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राम खत्री तर आभार श्री संजय चौगुले यांनी केले.
