प्रतिनिधी : संतोष निकम
इंदापूर : वासुदेव शंकरराव काळे जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे ग्रामीण (दक्षिण) यांचे प्रमुख उपस्थितीत प्रा. राम आसबे यांची भाजपा इंदापूर तालुका ग्रामीण मंडळ सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
प्रा.राम आसबे यांनी पक्षाचे नेहमी प्रामाणिक पणे काम केले आहे, अगदी पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी भारतीय जनता पक्षाचे साथ सोडली नाही, नेहमी चांगल्या पद्धतीने काम केल्याची दखल घेत आसबे यांचे वर इंदापूर तालुका ग्रामीण मंडळ सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.
भाजपाने पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) कार्यकारिणी सादर केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर (माऊली) चवरे. उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब पानसरे, उपाध्यक्ष श्री. नानासाहेब शेंडे, जिल्हा चिटणीस श्री. प्रेमकुमार जगताप, चिटणीस श्री. रविंद्र देवकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. साकेत जगताप, सरचिटणीस श्री. अजिंक्य टेकावडे, सरचिटणीस श्री. वैभव सोलनकर, सरचिटणीस श्री. स्वप्नील मोडक, सरचिटणीस श्री. अनिकेत ढमाले, इंदापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री. तेजस देवकाते, सरचिटणीस श्री. राजकुमार जठार, इंदापूर ग्रामीण मंडळ सरचिटणीस श्री. राम आसबे इंदापूर शहर मंडल अध्यक्ष श्री. किरण गानबोटे सरचिटणीस श्री. हर्षवर्धन कांबळे यांची पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.