प्रतिनिधी : संतोष निकम…
इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी इंदापूर विधानसभा मतदार संघात आमदारकीची हॅट्रिक साधणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू ना.दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता श्री वाघ पॅलेस इंदापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिली.