Rohit Pawar नाशिक : देशासह राज्यात लोकसभा २०२४ निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडली आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, महायुती व मित्र पक्षाकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरु आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात निवडणुकीत 2 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत 150 कोटी खर्च करण्यात आले आहे.
आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती घेणार!
चंद्रशेखर बावनकुळे यांचाच विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्थर हे भाजपच्या मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.