श्रीक्षेत्र रांजणी देवाची तालुका माढा येथील श्री ओंकारनाथ भगवान लघु रुद्र अभिषेक सोहळा निमित्त राजाभाऊ इंगळे व त्यांचे बंधू भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल राजे इंगळे हे प्रत्येक वर्षी महाप्रसाद पंगत घालतात सालाबाद प्रमाणे या वर्षी पंधरावे महाप्रसाद पंगतीचे नियोजन केले.
यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील पत्नी भाग्यश्री पाटील व भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता ताई पाटील ठाकरे आणि इंगळे परिवार यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला, यावेळी हजारो लोकांनी महाप्रसाद घेतला.
नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमातून सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना मदत करणारे अमोलराजे इंगळे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये चांगला फायदा होणार आहे हिंदू संस्कृती आणि जुन्या रूढी परंपरा टिकवून ठेवणारे इंगळे परिवार यांचे कडून असेच समाजकार्य घडत राहो असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरभरून कौतुक केले.