· लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते; एका वाक्यात शरद पवारांचा प्रफुल पटेलांवर हल्लाबोल - Live महान्यूज

लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते; एका वाक्यात शरद पवारांचा प्रफुल पटेलांवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. महराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांनी मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांनी सडकून टीका केली.

शरद पवार म्हणाले, जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते नाही असं नाही पण लाचारीला काही मर्यादा असते, त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या आहेत. एक चांगले झालं की त्यांनी सांगितले की पुन्हा आम्ही काळजी घेऊ .

महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. आज पहिल्यांदाच प्रफुल पटेलांच्या या कृतीचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *