(दि.१९) रोजी इंदापुर येथील साईसेवा हॉस्पीटल मधील डॉक्टरांना मारहाण झाली होती. त्याबाबत इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नाना उर्फ अभिषेक आण्णा कोळेकर रा. तरंगवाडी ता. इंदापुर जि.पुणे, दैवत उर्फ देवा रामचंद्र जाधव, रविंद्र दत्तात्रय भंडलकर दोघे रा. कौठळी ता. इंदापुर जि.पुणे, यांचेवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा करुन आरोपी फरार झाले होते.
त्याबाबत मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक यांना नेमण्यात आले होते. गुन्हे शोध पथकाने त्या आरोपींचा माग काढून त्यांना ३२ तासात अटक केले असुन त्यांना मे. न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार विनोद रासकर हे करीत आहेत.सदरची कारवाई पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा पो फौजदार प्रकाश माने, पो. हवा. विनोद रासकर, सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, नंदु जाधव, अंकुश माने, तुषार चव्हाण यांनी केली आहे.