लुमेवाडी लिंबोडी येथील अनेक दिवसा पासुन पाण्या साठी चालू असलेली वणवण अखेर थांबली.

दुष्काळ परिस्थिती असताना देखील लुमेवाडी लिंबोडी येथील पाण्याचा प्रश्न पाण्याच्या टँकरद्वारे इंदापूर पंचायत समितीतर्फे मार्गी लागला असून आता या गावाला पाण्याचे कोणतीही समस्या भेडसावत नाही बरेच दिवसापासून लुमेवाडी लिंबोडी येथील पाणी प्रश्नाचे गंभीर समस्या जाणवत होती ह्या समस्या दूर करण्यासाठी पंचायत समिती इंदापूर गटविकास अधिकारी खुडे साहेब तसेच इंदापूरचे विद्यमान तहसिलदार पाटील साहेब व लुमेवाडी येथील प्रशासकीय अधिकारी मा. घोगरे साहेब तसेच ग्रामसेवक मिसाळ साहेब यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन लुमेवाडी लिंबोडी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावत पंचायत समिती इंदापूर यांच्यातर्फे पाण्याचा टँकर दैनंदिन व्यवस्थित रित्या मिळत आहे व त्याचे योग्य प्रकारे पाणी हे जनतेपर्यंत पोहोचत आहे पाण्यासाठी होणारी रोजची वणवण या पाण्याच्या टँकर मुळे थांबले आहे जर पाणी टँकर चालू झाला नसता तर गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी कोणाच्यातरी विहिरीला किंवा कोणत्यातरी रानात पाणी चालू असेल तर तिथे पाण्याला जावे लागले असते तसेच पाणी मिळावे यासाठी गावातील महिलांना कामावरूनही घरी राहावे लागत असे यामुळे येथील महिलांना रोज कमीत कमी एक ते दीड किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती पण ही पायपीट गावाला पाण्याचा टँकर चालू झाल्यामुळे थांबली यामुळे पाण्याचा व उदरनिर्वाहाचा दोन्ही प्रश्न या पाण्याचा टँकर चालू झाल्यामुळे सुटला गावातील लोक आनंदी आहेत या टँकर मुळे गावातील जनताच नव्हे तर जे जनावरे यांची देखील तहान या टँकरद्वारे भागत आहे सध्याच्या या दुष्काळ परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना यावर मात करत पंचायत समिती इंदापूर यांनी पाण्याचा टँकर मंजूर करून दिल्या बद्दल गावातील लोक हे त्यांचे मनोमन आभार मानत आहेत व पाण्यासाठी ते आनंद व्यक्त करत आहेत व वरील जे अधिकारी आहेत त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला त्या सर्वांचे आभार मानत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *