मोठी बातमी: उजनी धरणात बोट उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडी आर एफ) जवान शोधकार्याला सुरुवात करण्या साठी उजनी धरणाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर एनडीआरएफचे जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. मंगळवारी संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील कुगाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील काळाशी येथे जाण्यासाठी हे प्रवासी बोटीने निघाले होते. त्यावेळी वादळी वारे वाहू लागल्याने बोट उलटी झाली. यावेळी बोटीवर सात प्रवासी होते. यापैकी एकजण पोहत बाहेर आला होता. त्यामुळे या दुर्घटनेची समोर आली. त्यानंतर उर्वरित सहा जणांचा शोध सुरु होता. मात्र, शोधकार्याच्या संथगतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.