इंदापूर तालुक्यातील काझड गाव येथील रहिवासी आणि सध्या शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्यात को-जन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले श्री. गिरीश कुंडलिक झगडे यांची कार्यकारी संचालक पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये सर्वात कमी वयाचा कार्यकारी संचालक होण्याचा बहुमान ही मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.
मेहनतीचा वारसा आणि शिक्षणाची जिद्द
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गिरीश झगडे यांचे बालपण कष्टात गेले. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात बैलांच्या साहाय्याने ऊस बांधणीचे काम केले, आणि गिरीश यांनीही अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना सुट्ट्यांमध्ये काही काळ वडिलांसोबत हीच कामे केली. मात्र, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत
गिरीश झगडे यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारामती अॅग्रो, निरा-भिमा सहकारी, शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज, जुबिलंट सायन्स, अंबालिका शुगर , सुभाष शुगर यांसारख्या नामांकित साखर कारखान्यांमध्ये विविध पदांवर जबाबदारी लीलया पार पाडली. सध्या ते शरयु ऍग्रो येथे को-जन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
अभ्यासवृत्ती आणि कौशल्याचा उत्तम संगम
शिक्षणाकडे लक्ष देत त्यांनी बॉयलर प्रचालक अभियंता परीक्षा उत्तीर्ण केली, फायनान्समधून एम बी ए पूर्ण केले. त्यांच्या प्रचंड अभ्यासवृत्ती आणि नवनवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीमुळेच त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
गावकऱ्यांचा आणि मित्रपरिवाराचा अभिमान
गिरीश झगडे यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आणि मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या अथक मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण
