खुन व खुनाचा प्रयत्न करणारे दोन आरोपींच्या इंदापुर गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या अंधारात आवळल्या मुसक्या
दिनांक २७/०२/२०२५ रोजी इंदापुर पोलीस स्टेशन हददीतील खोरोची या गावी संकेत हेगडकर यांचेवर बंदुकीने गोळीबार झाला. त्यावरुन इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं १६६/२०२५ बी.एन.एस कलम १०९,११५(२), ३५१ ३५१(२), ३(५) आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे निरंजन लहु पवार रा. खोरोची व जिजा उर्फ मयुर मोहन पाटोळे रा. निमसाखर ता इंदापुर जि पुणे हे सदर गुन्हा करुन फरार झाले होते. त्याबाबत मा. पोलीस अधिक्षक सोो यांनी तपास कामी दिलेल्या सुचनांप्रमाणे कारवाई करुन सदर आरोपी यांना तात्काळ अटक करा असे सांगीतले. तसेच त्याच दिवशी दिनांक २७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वा.चे सुमा. मौजे निरवांगी ता. इंदापुर जि पुणे येथे इसम नामे उत्तम जालींदर जाधव रा. खोरोची ता इंदापुर जि पुणे यास मौजे निरवांगी हदद्दीत अडवुन त्याचा लोखंडी तलवारीने, दगड व कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. सदरचे आरोपी हे वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं ७५/२०२५ बी. एन. एस १०३(१) वगैरे गुन्हयात देखील फरार असुन त्यांना अटक करणेकामी मा. पो. अधिक्षक साो पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक साो गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साो पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे साो यांचे मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सपोनि जीवन मोहीते, सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांचे पथक नेमले व गुन्हे शोध पथकाला यातील आरोपी हे मौजे शिंदी खु.ता.माण जि सातारा येथील डोंगरावर वास्तव्यात असले बाबत माहीती प्राप्त झाली होती. सदर दोन्ही आरोपी हे आपले अस्तीत्व लपवुन इंदापुर पोलीसांचे हातात कधिच येणार नाही असे दावे करत होते. आरोपीनी दिलेले चॅलेंज गुन्हे शोध पथक, इंदापुर यांनी स्विकारुन सदर आरोपी है शिंदी खुर्द दहीवडी भागातील डोंगर दऱ्यांमध्ये ज्या ठीकाणी लपुन बसले आहेत त्याबाबतचा छडा लावुन गुन्हे शोध पथक, इंदापुर यांनी मौजे शिंदी खु. ता. माण जि सातारा येथील दऱ्यात, रानावनात, डोंगरात आरोपींचा तीन दिवस सातत्याने व शिताफिने शोध घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा.पो.अधिक्षक साो पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक सो गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साो, पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे साो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन मोहीते,, सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पो अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांनी केली आहे.