महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक संजय भैय्या सोनवणे यांचा वाढदिवस व पक्षाचा द्वितीय वर्धापन दिन इंदापुरात मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक संजय भैय्या सोनवणे यांचा वाढदिवस व पक्षाचा द्वितीय वर्धापन दिन इंदापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनी वरून सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे क्रीडा व युवकल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित रहात संजय भैय्या सोनवणे यांच्या कामाचे कौतुक केले. 

अल्पावधीत 23 जिल्ह्यांमध्ये पक्षाचे काम सुरू झाले असून राज्यात गाव तेथे शाखा या उपक्रमांतर्गत हजारो शाखा पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सर्व जाती-धर्माना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर या पक्षाची आघाडी आहे. यावेळी अंगद गायकवाड विजय बनसोडे अमजद मोमीन तुषार भोसले भागवत सर्व दे देवा मोरे योगेश सोनवणे शेखर कांबळे अर्जुन गायकवाड सागर देवकर प्रकाश वाघमोडे अनिल कडाळे दीपक कांबळे पप्पू चंदनशिवे दिनेश गायकवाड अमित घोडके कालिदास लुचारे नितीन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

लखन भंडारे महेंद्र जाधव गौतम सरतापे आणि पहिली नाव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *