इंदापूर : दत्तनगर मतिमंद शाळा येथील 2 फेब्रुवारी 2025 रोजी समाजात वंचित आणि विशेष मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना ठेवत गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे यांनी आपल्या मुलाचा चि. मल्हार खुडे याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी मतिमंद शाळेत जाऊन तिथल्या मुलांसोबत आनंद वाटून घेतला खुडे कुटुंबीयांनी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्य दिले. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात वाढदिवस साजरा केला व आनंद व्यक्त केला.

या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी श्री सचिन खुडे यांचे आभार मानले आणि अशा सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समिती कर्मचारी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसामुळे मतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले.