इंदापूर : सार्वजनिक शांतता बिगडवणाऱ्या पाच मुलांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा करण्यात आला आहे.
थोडक्यात माहिती अशी की..दि.16/01/2025 रोजी 5.30 वाचे सुमारास मौजे इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे गावचे हद्दीत एस. टी. स्टॅन्ड समोर जुना सोलापुर ते पुणे हायवे रोडवर भिमाई मुलनिवासी पुस्तकालय समोर काही मुले सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आरडाओरडा करुन आपआपसात एकमेकांचे अंगावर जावुन ओढाओढी करून मारामारी करत असताना घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोपान बोंबे (वय 33) यांना आढळून आले.
पोलिस कॉन्स्टेबल बोंबे यांचे फिर्यादीनुसार आरोपी- 1) केदार लक्ष्मण गोडसे रा. सातपुतेवस्ती इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे 2) पृथ्वीराज मधुकर नरुटे रा. माळवाडी नं 1 ता. इंदापुर जि.पुणे, 3) सौरभ सुरेश बेंद्रे रा. माळवाडी नं 1 ता. इंदापुर जि.पुणे 4) केतन बोडके रा. गलांडवाडी नं 2 ता. इंदापुर जि.पुणे, 5) ओम धनाजी गलांडे रा. गलांडवाडी नं 2 ता. इंदापुर जि.पुणे यांचेवर भारतीय न्याय संहिता 2023 194(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास अंमलदार-पो. हवा. रासकर करत आहेत.
काही दिवसापूर्वीच इंदापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या मुलांना समज दिला होता. परंतु कायद्याचे पालन न करणाऱ्या या मुलांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.