इंदापूर प्रतिनिधी : संतोष निकम.
इंदापूर : आज दि ७/१२/२०२४ रोजी सकाळीच मा अप्पर पोलीस अधिक्षक साो बारामती विभाग यांनी हददीत घडलेल्या गंभीर गुन्हयाचे तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे उपस्थितीत बारामती उपविभागातील अधिकारी व अंमलदार यांची तातडीची बैठक घेवून मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपासाची दिशा ठरवत असताना पो कॉ गणेश डेरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे शेटफळहवेली पाटी ता इंदापूर जि पुणे येथे एक इसम पिस्तुल विकी करणेसाठी येणार आहे.

त्यानी सदरची माहीती प्रभारी अधिकारी यांना दिलेवर त्यांनी मार्गदर्शन करुन सापळा लावून छापा घालण्याच्या सुचना दिल्या त्या वरुन गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि मोहीते व सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पो कॉ गणेश डेरे, पो कॉ अंकुश माने, यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून छापा घालून इसम नामे स्वप्नील नवनाथ नाईकनवरे वय २५वर्ष रा बावडा ता इदांपूर जि पुणे यांस पिस्तुल आणी एक जिवंत काडतुसा सह ताब्यात घेतले आणी त्याचेवर इंदापूर पोलीस स्टेशन गु र न १०२५/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो हवा खान ५१५ हे करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक साो पंकज देशमुख अप्पर पो अधिक्षक गणेश बिरादार, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि मोहीते व सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पो अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांनी केली आहे.
