इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले
इंदापूर प्रतिनिधी /संतोष निकम
दि. 11/11/2024
इंदापूर तालुक्यातील काही विरोधी उमेदवारांनी प्रविण भैया माने यांचा धसका घेतला असुन प्रविण भैया माने यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने विरोधक पुरते धास्तावले असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे त्यातच आता इंदापूर तालुक्यातील शहा गावात अपक्ष उमेदवार प्रवीणभैया माने यांच्या प्रचाराचा बॅनर फाडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
याचवेळी या बॅनर शेजारी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा बॅनर व त्याच्या शेजारी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा बॅनर फाडला जातो. व दत्तात्रय भरणे यांचा बॅनर शाबूत राहतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुका मध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यानी निषेध व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे जर विरोधक दास्ती घेऊन अशी कृत्य करत असतील तर त्याला कायदेशीर उत्तर देऊ असे कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.