राज्यातील आजचे कांदा बाजारभाव.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 97 हजार 920 क्विंटलची आवक झाली. यात आज लाल कांद्याला (Red Onion) सरासरी 1750 रुपयांपासून ते 3241 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1800 रुपयांपासून ते 03 हजार 50 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 08 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Summer Onion) 16 हजार क्विंटलची आवक झाली. सर्वाधिक 10 हजार क्विंटलची आवक मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये झाली. या ठिकाणी 2700 रुपयांचा दर मिळाला.  तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 12, हजार 933 क्विंटलची आवक होऊन 2600 रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजारात (Nagpur Market Yard) लाल कांद्याला 2750 रुपयांचा दर मिळाला. तर हिंगणा बाजार समितीत 3200 रुपयांचा दर मिळाला.

अजून कांद्याला येवला बाजारात 2800 रुपये, नाशिक बाजारात 2700 रुपये, लासलगाव बाजार 2851 रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात 3050 रुपये, सिन्नर बाजारात 2800 रुपये, कळवण बाजारात 2650 रुपये, तर देवळा बाजारात 3025 रुपयांचा दर मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *