Solar rooftop Yojana 2024: केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेची अधिकृतपणे घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशांमधील एक कोटी घरांवर सोलार पॅनल लावण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
Pm surya ghar solar panel scheme
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक किलोवॅट सोलर पॅनल साठी 30000 रुपये सबसिडी व दोन किलोमीटर सोलर पॅनल साठी 60 हजार रुपये सबसिडी तसेच तीन किलोमीटर सोलर पॅनल साठी 78 हजार रुपये सबसिडी दिली जाते.
यासोबतच जर तुम्ही सोलार पॅनल बसवला असेल तर या सोलर पॅनल व्यतिरिक्त जर तुम्ही तीनशे युनिट पर्यंत वीज वापरली असेल, तर ती वीज अगदी मोफत शासनाकडून दिली जाईल.
भारतामधील कोणताही ग्राहक एक ते तीन किलोमीटर पर्यंतच्या सोलर पॅनल साठी अर्ज करून त्याचा लाभ मिळवू शकतो.
ही सोलर पॅनल महिन्याला प्रति किलोवॅट 100 युनिट पर्यंत वीज तयार करतात. यानुसार त्यांचा बसवलेला खर्च हा पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये पूर्णपणे निघून जातो. व त्यापुढील वीस वर्षे हा सोलार पॅनल तुम्हाला अगदी मोफत वीज देईल.
सोलार योजनेअंतर्गत होणारे फायदे
- पीएम सूर्यघर योजनेंतर्गत, ज्या घरात सौर पॅनेल बसवले आहेत त्यांना सरकार ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणार आहे.
- तुम्हाला फक्त 300 युनिटपेक्षा जास्त विजेचे बिल भरावे लागेल, यामुळे तुमचे वीज बिल खूप कमी होईल.
- या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक घर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि भारताला त्याचा फायदा होईल. ही योजना निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करेल.
- या योजनेमुळे भारतात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. आणि त्यामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील.
- पीएम सूर्य घर योजनेंतर्गत ज्या घरात सौर पॅनेल बसवले जातील तेथे २४ तास वीज असेल. या घरात वीजपुरवठा खंडित होणार नाही.
नोंदणी कशी करावी? Registration for solar scheme
- वापरकर्ता नोंदणी” निवडा.
- तुमची माहिती भरा: विनंती केलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जसे की नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनीचे नाव आणि ग्राहक क्रमांक इ.
- पासवर्ड तयार करा: एक मजबूत पासवर्ड तयार करा आणि तो पुन्हा टाइप करा.
- अटी व शर्ती स्वीकारा: अटी व शर्ती वाचा, त्यावर खूण करा आणि “नोंदणी करा” बटणावर क्लिक करा.
- तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे: तुमच्या मोबाईल नंबरवर एक नोंदणी यशस्वी संदेश पाठवला जाईल आणि तुमच्या ईमेलवर एक पुष्टीकरण लिंक पाठवली जाईल.
लॉगिन कसे करावे: लॉगिन प्रक्रिया
- वेबसाइटला भेट द्या: या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर तुम्हाला Apply for Rooftop Solar पर्याय दिसेल . त्यावर क्लिक करा.
- लॉगिन: “लॉगिन” पर्यायावर क्लिक करा.
- तुमची माहिती प्रविष्ट करा: तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
- लॉगिन: “लॉगिन” बटणावर क्लिक करा.
- तुम्ही लॉग इन केले आहे: आता तुम्ही तुमचा डॅशबोर्ड पाहू शकता, जिथे तुम्हाला अर्जाची स्थिती, लाभार्थ्यांची यादी, सबसिडी कॅल्क्युलेटर इत्यादी माहिती मिळेल.
⚪⚪⚪
अर्ज कसा करायचा?
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात .