इंदापूर; शहा गावचे सर्वांचे लाडके व पंचक्रोशीतील सर्वोत्तम मल्ल म्हणून ज्यांचा नामोल्लेख होता, तसेच कुस्ती ची आवड असल्याने व पंचक्रोशीतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून शहा येथे तालीम बांधून त्या ठिकाणी वस्ताद म्हणून मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून परिश्रम करून सर्वोत्तम पहिलवान बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे कै. पै. शंकर (वस्ताद) इजगुडे यांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले, यामुळे शहा गाव व पंचक्रोशी तील सर्वांच्या हृदयात जागा करून राहिलेले, कै. पै. शंकर (वस्ताद) इजगुडे यांच्या अचानक जाण्याने कधीही न भरून येणारी उणीव भासू लागली आहे. अशा लाडक्या वस्तादचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. सागर बोराटे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले, यावेळी कै .पै. शंकर (वस्ताद) इजगुडे यांचा परिवार, मित्रपरिवार, शहा ग्रामस्थ, तसेच महाराष्ट्राच्या काना- कोपऱ्यातून आलेल्या पैलवान, वस्ताद यावेळी भाऊक झालेले दिसून आले.
मित्र परिवारां कडून प्रथम पुण्यस्मरण निमित्त लाडक्या वस्तादला अनोखी भेट म्हणून शहा गाव येथे भव्य निकाली कुस्त्यां ची जिंगी मैदान भरवण्यात आलं व अशाप्रकारे लाडक्या वस्ताद आला जो छंद होता त्याच पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी शहा गावामध्ये भव्य वृक्षारोपण करण्यात आले.
कै.पै.शंकर वस्ताद यांनी लावलेले एक रोपट म्हणजे छोटे बंधू पै.नाना इजगुडे!
पै. नाना इजगुडे या छोट्या बंधू साठी कै. पै. शंकर वस्ताद इजगुडे खूप परिश्रम घेऊन एक तगडा मल्ल बनविला आहे, आणि अलीकडे मोठे बंधू पै. धनाजी (वस्ताद) इजगुडे हे पै.नानासाठी वस्ताद म्हणून परिश्रम घेत आहेत, तसेच अंबालिका केसरी सारखे अनेक पदक पै.नाना इजगुडे यांनी पटकावून आपल्या भावांची महाराष्ट्रभर ओळख कायम ठेवली आहे.