इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर सव्वा अकरा वाजता अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला.सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे…याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून (क्र. MH 42 AX 1661) आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मल्हारी मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला.यावेळी गाडी मध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वाळू व मुरूम चोरांकडून हा हल्ला झाल्याची शक्यता?
इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा वाळू व मुरूम चोरांकडून झालेला असावा असा दाट संशय येत आहे ? कारण गेली आणि दिवसापासून तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वाळू च्या बोटी फोडून व मुरूम वाहतूक पकडून कारवाई केलेले आहे याचाच राग मनात धरून हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.