बाभूळगाव येथे काही दिवसां पासून पाणीटंचाई मुळे लोक हैराण झाले आहेत, लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची अडचण कशी टाळता येईल यासाठी बाभूळगाव ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका सौ रूपाली व्यवहारे यांच्या मदतीने ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सौ. रेश्मा सुखदेव गुरगुडे व उपसरपंच अनिल दशरथ चव्हाण, सदस्य दादासाहेब भोसले यांनी सध्या सोलापूर शहरासाठी उजनी जलाशयांमधून भीमा नदीमध्ये उन्हाळी आवर्तन चालू आहे, ते पाणी बंद होण्याअगोदर भाटनिमगाव येथील बंधारे चे दरवाजे (ढापे) नवीन बसवून पाण्याची गळती थांबावी यासाठी मा. जिल्हाधिकारीसो पुणे, मा.प्रांताधिकारीसो बारामती मा. तहसीलदारसो इंदापूर, मा. गटविकास अधिकारीसो इंदापूर यांच्या कडे ग्रामपंचायत मार्फत निवेदन दिले होते, याचीच गांभीर्या ने दखल घेऊन प्रशासनाने त्वरित भाटनिमगाव येथील बंधाऱ्या वरील दरवाजे (ढापे) बसवून घेतले. त्यामुळे सरपंच सौ.रेश्मा सुखदेव गुरगुडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
विद्यमान सरपंच यांची निवड होताच विकास कामांना वेग!
विद्यमान सरपंच सौ. रेश्मा सुखदेव गुरगुडे यांनी निवड होताच बाभूळगाव मधील विकास कामांना वेग वाढला आहे, रस्ते, जल जीवन मिशन, बंदिस्त गटारी, गरजू लोकांना घरकुले, अशाप्रकारे अनेक कामे स्वतः पुढाकार घेऊन कामे मार्गी लावली आहे. परंतु कामे करून प्रसिद्धी पासून दूर आहेत. त्यांच्या या कामा मुळे बाभूळगाव मधील जनतेत त्यांची लोकप्रियता वाढली आहे.