भारतीय जैन संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तसेच आरोग्य दक्षता समिती इंदापूर तालुकाध्यक्ष मा. धरमचंद गिरधारीलाल लोढा यांचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रदेश कार्यालय येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष मा. संजय भैय्यासाहेब सोनवणे यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला, मा.धरमचंद गिरधारीलाल लोढा यांनी युवा क्रांती प्रतिष्ठान व संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून सामाजिक कार्य केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे इंदापूर तालुका मध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष नेते मा.नारायण बापू गायकवाड इंदापूर तालुकाध्यक्ष मा.अंगद गायकवाड, पुणे जिल्हा उपध्यक्ष मा. अनिल कडाळे, माढा तालुकाध्यक्ष मा. कालिदास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मा.अमजद मोमीन,मा.विलास गायकवाड,मा.ज्ञानदेव गायकवाड, मा.बापूसाहेब वाघमारे मा. विलास लोंढे, मा.देवा मोरे, मा. विशाल जगताप तसेच महाराष्ट्रातील पब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
